महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्व पक्षा कामाला लागले आहेत. पुणे महापालिकेत अनेक जागांवरून भाजप विरुद्ध अजित पवार यांची राष्ट्रवादी यांच्यात वाद होण्याची शक्यता वर्तवण्यात येत असतानाच केंद्रीय सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी मोठा गौप्यस्फोट केला आहे. ज्याची चर्चा राजकीय वर्तुळात चांगलीच रंगली आहे.
तळेगाव दाभाडे नगरपरिषदेच्या डॉ. केशव बळीराम हेडगेवार या इमारतीचे उद्घाटन सोमवारी झाले. त्यावेळी मोहोळ बोलत होते. यावेळी त्यांनी राष्ट्रवादीकडून पक्ष प्रवेशाची ऑफर आल्याचा खुलासा केला. पण त्याच क्षणी त्यांनी पक्षाची बाजू मांडच चर्चेला वाव मिळण्यापूर्वीच पूर्णविराम देण्याचा प्रयत्न केला.
उद्घाटनावेळी बोलताना मोहोळ यांनी एक किस्सा सांगितला. 2019च्या विधानसभा निवडणुकीदरम्यान सुनील शेळकेंना भाजपने उमेदवारी नाकारल्यानंतर शेळके राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये गेले होते. त्यावेळी त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आणि सुनील शेळकेंची उमेदवारी जाहीर झाली आणि शेळकेंची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर पहिला फोन मला केला. माझं भाजपमधून तिकीट कट झालं आहे, मला राष्ट्रवादीतून तिकीट दिले आहे, तुझं पण तिकीट कट झालं आहे.
कोथरूडमध्ये चंद्रकांत पाटील आलेत, तू माझ्याबरोबर चल, त्यावेळी मी सुनील शेळकेंना बोललो मी दिल्या घरी सुखी आहे. तू पण राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाऊ नकोस, तर शेळके बोलले नाही, आता मी परतीच्या दोर कापले आहेत, तो त्या पक्षात गेला त्याचं भल झालं, मी माझ्या पक्षात राहिलो माझंही भल झालं, कारण आमची मैत्री अशी आहे. त्या काळात देखील माझी आठवण सुनिल शेळकेंना आली, असे मोहोळ यांनी म्हटले आहे.
मोहोळ यांच्या या विधानांमुळे राजकीय गोटात उलट सुलट चर्चा रंगल्या आहे. ऐन निवडणुकीच्या तोंडावर त्यांनी हा किस्सा सांगितल्याने त्यांच्या विधनांची अनेक अर्थ काढण्यात येत आहेत.


