22 C
New York
Sunday, August 24, 2025

Buy now

spot_img
spot_img

महापुरुषांन विषयी जातिवादक वक्तव्य करणाऱ्यांवरती सम्राट आर्मी कडून ॲक्शन मोड…

ठाणे – ठाणे जिल्ह्यातील शहापूर तालुका वाफे गोठेघर गावातील अमित कदम यांनी 15 दिवसापूर्वी त्याच्या इंस्टाग्राम अकाउंट वरून महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या बद्दल अपमान जनक पोस्ट करत होता. ज्यातून बौद्ध समाजातील लोकांच्या भावना दुखावल्या गेल्या होत्या. तसेच दोन समाजामध्ये तेढ निर्माण होईल असे कृत्य करून इंस्टाग्राम वर बौद्ध समाजातील लोकांना शिवीगाळही व दमदाटी केली होती. यावरती सम्राट आर्मीचे अनिल गजानन कांबळे यांनी शहापूर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

अनिल गजानन कांबळे यांच्या फिर्याद अनुसार ठाणे जिल्ह्यातील शहापूर तालुका वाफे गोठेघर गावातील रहिवासी अमित कदम यांच्यावर शहापूर पोलीस ठाण्यात भारतीय दंड संहिता ‌‌1860 अनुसार कलम- 153A, 294, 295A, 504,506 तसेच अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती अधिनियम 1981 अनुसार कलम- 3(1)(r),3(1)(s),3(1)(u),3(1)(पाच),3(2)(va) दाखल करण्यात आले आहे.
सम्राट आर्मीचे प्रमुख पी एस सम्राट यांच्याशी बोलणं झाल्यास त्यांनी सांगितले की महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तसेच सर्व महापुरुषांविरुद्ध कोणी अपमान जनक वक्तव्य केल्यास आम्ही त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करणार.

Related Articles

ताज्या बातम्या