पुणे – मुंढवा येथील स्थानिक पत्रकारास शिवीगाळ करून मारहाण केल्याची धक्कादायक घटना घडली आहे सीसीटीव्ही कॅमेरात कैद. या घटनेतील आरोपी धैर्यशील भैय्या गायकवाड विरोधात कायदेशीर कार्यवाही करण्यात यावी अशी मागणी आझाद समाज पार्टी युवा मोर्चा पुणे शहर च्या वतीने करण्यात येनार आहे.
पत्रकार विश्वास जगताप उर्फ काका यांना मुंढव्यातील भारत पेट्रोलियम या मालकाच्या पुतण्याने धैर्यशील (भैय्या) गायकवाड यांनी जय श्रीराम म्हणल्याच्या कारणाने पत्रकारास केली मारहाण व गळा दाबून जीव धोक्यात आल्याचे असे पत्रकार विश्वास जगताप यांनी पब्लिक पॉवरच्या पत्रकारांशी बोलताना सांगत होते व ते पुढे असे ही म्हणाले काही एक कारण नसताना धैर्यशिल भैया गायकवाड यांच्या सोबत त्याचे दोन मित्र नाव माहित नाही यांनी शिवीगाळ करून मारहाण केल्याची धक्कादायक घटना घडली घटनास्थळी मुंढवा पोलिस पेट्रोलींग साठी फिरत असताना त्यांच्या समोर हा प्रकार घडला परंतु भैय्या गायकवाडच्या दहशतीमुळे त्यांनी देखील जास्त काही न बोलता काढता पाय घेतला गाडी फिरवून निघून गेले भारत पेट्रोलियम पंपावर पेट्रोल भरत असताना ही घटना घडली आहे. यानंतर कायदा व सुव्यवस्थेचा विचार करून दि.२५ मार्च रोजी सदर प्रकारे गुन्हेगाराविरुद्ध कायदेशीर कारवाई व्हावी व अन्यायग्रस्त पत्रकारास न्याय मिळावा याकरिता मुंढवा पोलीस स्टेशनमध्ये उद्या सर्व पत्रकारांना घेवून उपस्थित राहणार आहोत.
सदर प्रकरणी पत्रकार विश्वास जगताप उर्फ काका हे उद्या मुंढवा पोलिस ठाण्यात समक्ष हाजर होवून दि.२५ मार्च रोजी झालेल्या घडणेची फिर्याद नावे धैर्यशिल भैया गायकवाड व त्याचे सोबत असलेल्या नाव माहित नाही अशाविरुद्ध भादवीचे कलम ३२४,३३६,३२३,५०४,५०६,३४ प्रमाणे गुन्हे दाखल करण्यात यावे. तरी वरील दोषींवर लवकरात लवकर कडक कारवाई करावी. आझाद समाज पार्टी युवा मोर्चा पुणे शहर यांच्या वतीने मुंढवा पोलिस स्टेशनला बुधवार निषेधार्थ निवेदन देण्यात येणार आहे.