पारनेर: घारगाव पोलिस स्टेशनच्या हद्दीत ऎकुण ४६ गावे तसेच वाड्या वस्त्यांचा मोठ्या लोक वस्तीचा परिसर आहे गेल्या काही वर्षापासून पठार भागात गुन्हेगारी बळावली आहे पठार भाग संवेदनशील बनत चालला असताना यात अनेकदा चोऱ्या दरोडे राजकीय गुन्हे अवैध व्यवसाय यामुळे हे पोलीस स्टेशन चर्चेत आले होते. पठार भागातील वाढत्या गुन्हेगारीमुळे नागरिक त्रस्त झाले आहेत विद्युत पंपाच्या वाढणाऱ्या चोऱ्या यामुळे शेतकरी देखील हैराण झाले आहेत परंतु या पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक यांनी सुरुवातीचे काही दिवस अगदी धडाकेबाज कारवाईचा बडगा हाती घेतला होता परंतु आता हा बडगा महीण्याच्या पाकीटात आल्यामुळे थंडावला आसल्याचे चित्र आहे.
बोटा घारगाव पोलीस स्टेशनच्या हद्दीत बोटा गाव अकलापूर रोड मुन्ना शेख यांच्या जागेत निळ्या पत्र्याच्या शेडमध्ये राजू लाबखेडे यांचा पत्त्याचा क्लब आहे तसेच येथे अवैध धंदे करणाऱ्यांनी उच्छाद मांडला आहे. तसेच क्लब वाल्यांना राजकीय पाठबळ असल्यामुळे यांना कोनाची भिती नसल्याचे चित्र आहे. अहमदनगर ग्रामीण पोलीस अधीक्षक याकडे गांबिर्याने लक्ष देतील का ?


