पुणे : उरूळी कांचन येथे मटक्याचे अड्डे पुन्हा जोमाने सुरू झाले आहेत. याबाबत ‘पब्लिक पावर’ ने यापूर्वीच इशारा दिला होता की, जुगाराच्या अड्डयांचे चालक आणि मटक्याचे अड्डा चालक यांनी पोलीस प्रशासनात ‘सेटिंग’ केली असून, हे अड्डे पुन्हा सुरू झाले आहेत.‘पब्लिक पावर’ च्या या दाव्याची पुष्टी करणारे उरूळी कांचन येथील काही मटका अड्डयांचे चालक-मालक व पत्त्यांसह ठिकाणे जाहीर करत आहेत.
प्राप्त माहितीनुसार :
१)उरूळी कांचन पोलिसांच्या हदीत बाजार मैदान येथे राजू नावाचा ईसम रूम मध्ये मटका घेत आहे.
२)पूर्वीकडे सटवाई चौकात एक पत्र्याच्या शेड मध्ये मोठा मटक्याचा जुगार चालतो.या अड्डयाचा मालक वनारसे आहे.
३) तळवाडी चौक शिंदावने रोड या ठिकाणी मटका मालक कांचन नावाचा ईसम चालवतो.
समाजास अत्यंत हानिकारक ठरणाऱ्या मटका, जुगार, गुटखा, गांजा, दारू इत्यादींमुळे अनेकांचे संसार देशोधडीस लागत आहेत. याठिकाणी केवळ झोपडपट्टीतील अल्प उत्पन्नातील लोक व हातावर पोट अवलंबून असणारे सर्वसामान्य नागरिकच नव्हे तर शासकीय, निमशासकीय कार्यालयातील नोकरदार मंडळी, अधिकारी, कर्मचारी, कित्येक लहान मोठे व्यावसायिक मटका, लॉटरी, सोरट, इत्यादींसारख्या अवैध व्यवसायांच्या प्रलोभनास बळी पडून ते या चक्रव्यूहात अडकलेले दिसत आहेत.
या परिसरात गुंडांकडून वर्चस्व निर्माण दहशत निर्माण करण्याच्या प्रयत्नांमुळे येथील सामाजिक शांततेचा ऱ्हास होत असून कित्येक कुटुंबे असुरक्षित होऊन रस्त्यावर येत आहेत.या व्यवसाय चालकांकडून पोलीस स्टेशन स्तरावर दोन पोलीस कर्मचारी नेमून हप्ते वसुली केली जात असल्याचे निदर्शनास येत आहे.
मा. पोलीस अधीक्षक यांनी पोलीस अधीक्षक पदाची सूत्र हाती घेताच अवैध धंद्यांवर निर्माण केलेली दहशत यावरच शंका उपस्थित होत आहे.अधीक्षक अवैध धंदे चालत असलेल्या क्षेत्रातील अधिकाऱ्यांवर कारवाई करतील का? असा प्रश्नही उपस्थित करण्यात येत आहे.