( पुणे ) : पुणे सोलापूर राष्ट्रीय महामार्गालगत असलेल्या दौंड हद्दीतील कुरकुंभ येथील फिरंगाई टेक्स्टाईल या पुर्वी कपड्याचे दालन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पत्र्याच्या शेडमध्ये बेकायदा वेश्याव्यवसायवर दौंड पोलिसांचे विशेष प्रेम आहे की काय? फिरंगाई टेक्सटाईल मार्केटमधील ही जागा या वैश्या व्यवसायासाठी उपलब्ध करून देणाऱ्या जागा आणि इमारत मालकांवर सहआरोपी म्हणून पोलिसांनी कारवाई करावी अशी मागणी आता होत आहे.
मागील काही महिन्यांपासून दिवस रात्र फिरंगाई टेक्सटाईल मार्केट मधील पत्रा शेडमध्ये बेकायदा वैश्या व्यवसाय सुरू आहे.
संबंधित जागामालकाच्या संगनमतानेच हा बेकायदा वेशाव्यवसाय कशावरून सुरू नसेल ? फिरंगाई टेक्सटाइल मार्केटच्या मालकालाही आरोपी करून या व्यवसायाला पाठीशी घातल्याप्रकरणी सहआरोपी करून गुन्हा दाखल करून कारवाई करावी. अशी मागणी कुरकुंभ परिसरातील नागरिक करीत आहेत.