पुणे : शिक्रापुर पोलीस स्टेशन नावालाच असून, अवैध धंद्यान बाबत काम मात्र शून्य असल्याचे दिसत आहे. त्यामुळं परिसरात मटक्याचा व पत्यांचा पुन्हा एकदा सुळसुळाट झाला असल्याची चर्चा नागरिकांमध्ये चालू आहे. अवैध व्यवसायीकांनी अक्षरशः कहर केला असून, सर्रास पणे अवैध धंदे चालू असल्याने, आपली मटका व पत्यां (जुगार)यांची दुकाने जोमात थाटली आहेत. कलेक्टर पोलीसांच्या मदतीने शिक्रापुर येथील चाकण चौकातील देशी दारूच्या शेजारी चक्री मटक्याचा व्यवसाय खुले आम चालू आहे. यामुळ अनेकांचे संसार उध्वस्त होत आहेत.
शिक्रापुर पोलीस ठाण्याच्या हद्दीत अनेक ठिकाणी अवैध धंदे खुलेआम चालू असल्याने; शिक्रापुर पोलीस कुठे व्यस्त आहेत ? अशी चर्चा जोरदार चालू आहे. पोलिसांचे काम संशयास्पद असून, बेकायदेशीर धंदेवाल्यावर ना कोणाचा धाक आहे ना दरारा. विशेष म्हणजे पोलीस खात्याला हे अवैध धंदेवाले जुमानतसुद्धा नसल्याचे बोलले जात आहे. तर कोण पोलिस व पत्रकार आमचे काही करू शकत नाही, आम्ही पोलीसांना महिन्याला लाखो रू हप्ते देतो; असे म्हणण्यापर्यंत त्यांनी आता मजल मारली आहे. ह्या लोकांना काही प्रतिष्ठित व्यक्तींना जवळ करून, पोलीसांच्या मदतीने व्यवसाय थाटला आहे की काय? असा सवाल येथील नागरिक करीत आहे.
हे असे असेल तर पोलीस प्रशासनाने मात्र वेळीच यांना लगाम न घातल्यास, याचे दुष्परिणाम जनतेला आणि पोलिस प्रशासन यांना सहन करावे लागणार हे मात्र निश्चित. पोलीसांकडून या धंदेवाल्यांवर कारवाई करण्याऐवजी महिन्याला हप्ते वसुली केली जाते; अशी नागरीकामध्ये जोरदार चर्चा चालू आहे. तर याविषयी पोलीस स्टेशनला तक्रार करणेस गेले की, धंदे बंद आहेत असे सांगण्यात येते..
मग शिक्रापुर पोलीस काय हप्ते गोळा करण्यासाठी आहेत का? असा सवाल नागरिक करत आहेत. हे बेकायदा मटका, क्लब, गांजा व चक्री हे अवैध धंदे या भागात मोठ्या प्रमाणात सुरू आहेत. या भागातील पोलिस अधिकारी मात्र मूग गिळून गप्प बसले असून, त्यांचा या भागात कसल्याच प्रकारचा धाक नसल्याने अवैध धंदेवाल्यांनी आपले धंदे बेकायदेशीरपणे चालू ठेवले असल्याचे बोलले जात आहे.
सरास ढाब्ये व हॅाटेलवरती विना परवाना दारू विकली जाते. पोलीस हे पाहुन सुद्धा न पाहिले सारखे करत असतात; कुठे रेड होनार आसेल तर ते कलेक्टर साहेब आधीच कळवतात? शिक्रापुर येथील कित्ती अवैद्य धंदे वर कारवाई केली PI साहेब तुम्हीच सांगा.! अवैद्य धंदे वालेना पाटीसी घालत आहे का? कोणत्या नेते मंडळी यांचा गुन्हे दाखल करू नका आसे दबाव आहे का अशी नागरीकान मध्ये जोरदार चर्चा चालू आहे.
अवैद्य धंदेवाल्यांनीच पोलीस स्टेशन चालवायला घेतले की काय?असा प्रश्न स्थानिक नागरिकांना पडला आहे.