पुणेः शहरात दिवसेंदिवस अपघाताच्या प्रमाणा वाढताना दिसत आहेत. मागील काही दिवसातील कात्रज चौकामध्ये हा ३ रा बळी आहे. अपघाताचे सत्र सुरू असून यामध्ये नागरिकांना जीव गमावावा लागत आहे.
चौकामध्ये सकाळी साडे-सहाच्या सुमारास मानसी अशोक पवार वय-२६ रा. आंबेगाव पठार, या वेस्पा दुचाकीवरून कात्रज कोंढवा रस्त्याच्या दिशेने जात असताना अज्ञात टँकरचा धक्का लागल्याने जागीच मृत्यू झाला.
मागील काही दिवसांपासून कात्रज चौकामध्ये अपघाताचे सत्र सुरू असून यामध्ये नागरिकांना जीव गमावावा लागत आहे. हे अपघात सत्र कधी थांबणार? असा प्रश्न नागरिकांकडून उपस्थित होते आहे..