कोंढवा – ‘गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या’च्या गजरात कोंढवा येथील सार्वजनिक गणेश मंडळांच्या गणेश मुर्तीचे विसर्जन उत्साह शांततेत पार पडले. विसर्जन मिरवणुकीदरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलिसांचा तगडा बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
कोंढवा तील विविध चौकात , मुख्य मार्गांवरून सार्वजनिक गणेश मंडळांच्या गणरायांच्या मिरवणुका काढण्यात आल्या. ढोल, ताशे, लाऊडस्पिकरसह विविध वाद्यांचा मिरवणुकीमध्ये समावेश होता. विसर्जन मिरवणुका शांततेत पार पडाव्यात म्हणून कोंढवा पोलीस स्टेशनचे वरिष्ठ अधिकारी विनय पाटणकर साहेब , मानसिंग पाटील साहेब व त्यांचे सहकारी कोंढवा पोलीस स्टेशन चे शेकडो कर्मचारी बंदोबस्तामध्ये सहभागी झाले होते.
गणेश विसर्जनाची मिरवणूक शांततेत पार पाडण्यासाठी गणेश मंडळे नागरिकांचे सहकार्य लाभले. भावपूर्ण वातावरणात, ढोल-ताशांच्या गजरात गणेश भक्तांनी गणरायाला पुढच्या वर्षी लवकर येण्याचे निमंत्रण देत निरोप दिला.