पुणे : शहरात दिवसेंदिवस घडणाऱ्या गुन्हेगारी घटनांनी थैमान घातला आहे. रामटेकडी परिसरातील वंदेमातरम चौकात मध्यरात्री दीड वाजण्याच्या सुमारास घडली. दारूसाठी पैसे देण्यावरुन झालेल्या हाणामारीत अल्पवयीन मुलांनी गुंडाचा दगडाने ठेचून खून केल्याचा प्रकार समोर आला आहे. माहिती मिळताच वानवडी पोलिसांनी पाच जणांना ताब्यात घेतल्याची माहिती आहे.
राजू शिवशरण (वय ३६, रा. रामटेकडी, हडपसर) असे खून झालेल्या गुंडाचे नाव आहे. वानवडी पोलीस ठाण्यात राज शिवशरण याच्याविरुद्ध अनेक गंभीर गुन्हे दाखल आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, राजू शिवशरण हे दारू पिऊन शुक्रवारी मध्यरात्री दीडच्या सुमारास वंदेमातरम चौकात थांबले होते. त्यावेळी दारु पिण्यास मुलांनी राजूकडे पैसे मागितले. त्याने नकार दिल्याने त्यांच्यात वादावादीला सुरुवात झाली. शिवशरण याने शिवीगाळ केल्याच्या रागातून मुलांनी त्याला वीट, दगड, सिमेंटचे तुकडे लाथाबुक्क्यांनी मारहाण करण्यास सुरुवात केली. शिवशरण याच्या डोक्यात दगड घातला तर, दुसऱ्याने डोक्यात दारुची बाटली फोडली. फिर्यादी आपल्या मामाला वाचविण्यास गेलेल्या फिर्यादीच्या डोक्यात बाटली मारुन जखमी केले. पोलिसांना कळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली व शिवशरण यांना पोलिसांनी ससून रुग्णालयात नेले. परंतु, डॉक्टर तपासणीपूर्वीच त्याचा मृत्यु झाला होता.
याप्रकरणी निखिल कैलास चव्हाण (वय १६, रा. वंदेमातरम चौक, रामटेकडी) यांनी वानवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.