पुणे – कोंढवा बुद्रुक येथील युवकास पोलिस ठाण्यात नेऊन पोलिसांनी बेदम मारहाण केली. या प्रकरणी कोंढवा पोलीस ठाण्याचे अधिकारी व कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्याबाबत. ऊद्या पुणे पोलिस आयुक्त यांना निवेदन देण्यात येनार आहे.
याबाबत माहिती अशी की, कोंढवा बुद्रुक येथील रहिवाशी महादेव हनुमंतराय डोंगराजे यांस विचारपुस करण्याच्या नावाखाली कोंढवा पोलीस ठाण्यात नेऊन बेकायदेशीररित्या न्यालयाचे समन्स आदेश वॉरट नसताना कोंढवा पोलीस ठाण्याचे पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांनी या युवकास बेदम मारहाण केली. कोंढवा पोलिसांच्या या प्रतापाबाबत पुणे पोलीस आयुक्त यांना उद्या निवेदन देण्यात येणार आहे. या घटनेची सखोल चौकशी करुन दोषी पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांवर कारवाई न झाल्यास उपोषण व मोर्चा र्काढण्याचा इशारा निवेदनातून देण्यात येणार आहे.
कोंढवा परिसरात अवैध धंदे, चोऱ्या घरफोड्या होत असतांना या घटनेचा तपास करण्यात पोलिसांकडून टाळाटाळ होत आहे. अशात एका तरूणाला विनाकारण बेदम मारहान करण्यात आली.
या अधिकारी व कर्मचाऱ्यांवरती पुणे पोलीस आयुक्त काय कारवाई करतील याकडे जनतेचा लक्ष लागला आहे..