पुणे (कॅम्प) : बंगला नंबर 16 समोर एल्फिन्स्टन रोड कॅम्प येथे दुभाजकाला धडकून पहाटे ४ च्या सुमारास कारचा अपघात झाला. सुदैवाने कोणतीही जीवित हानी झाली नाही. येथे अशाच पद्धतीने अपघात होत आहे. रात्रीच्या वेळी पथ दीप बंद असल्यामुळे अंधार होत असल्याने दुभाजक दिसून येत नाही त्यामुळे वारंवार अपघात होत आहेत.
या ठिकाणी दुभाजकाला परावर्तक चिन्ह बसवलेले नाही; त्यामुळे अपघातांचे प्रमाण वाढत आहे. मोठ्या दुभाजकामुळे वाहतुकीस रस्ता कमी उपलब्ध होऊन वाहतूक कोंडीही होत असते. प्रशासनाने दुभाजक काढून तरी टाकावा अशी येथील नागरिकांची मागणी आहे.