10.5 C
New York
Thursday, May 22, 2025

Buy now

spot_img
spot_img

कोरेगाव पार्क येथील स्पा मधून ६ मुलींची गुन्हे शाखे कडून सुटका…..

पुणे : कोरेगाव पार्क परिसरातील मसाज सेंटरमध्ये सुरु असलेल्या वेश्या व्यवसायाचा पडदा गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा विभागाने उघडकीस आणला आहे. या कारवाईत थायलंडच्या ४ तरुणींसह ६ मुलींची सुटका करण्यात आली असून मसाज मालक व मॅनेजर यांच्यावर कोरेगाव पार्क येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी अवैद्यरित्या मुलींना मसाज च्या नावाखाली जास्त पैशाचे अमिषा दाखवून मसाज पार्लर मध्ये वेश्या व्यवसाय करुन घेत होते.

मॅनेजर शाहरुख अहमद चौधरी (वय 27, रा. जाधवनगर, मुंढवा मुळ रा. जुनिजान ता. जि. हुजाई, आसाम) आणि स्पा मालक सुरेंद्र जगन्नाथ पाटील (वय 32, रा. सुखवानी रॉयल सोसायटी, विमाननगर) यांच्यावर आयपीसी 370, 34 सह अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पोलीस हवालदार रेश्मा सुरेश कंक यांनी कोरेगाव पार्क पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. ही कारवाई मंगळवारी सायंकाळी ६ वाजता केली.

कोरेगाव पार्क परिसरातील ज्वेल स्क्वेअर या इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावर असलेल्या मसाज सेंटर येथे वेश्या व्यवसाय सुरु असल्याची माहिती सामाजिक सुरक्षा विभागाला समजली. त्यानुसार पोलीस पथकाने बनावट ग्राहक पाठवून खात्री करुन घेतली. त्यानंतर मसाज सेंटर येथे छापा टाकून ६ तरुणींना ताब्यात घेतले. यामध्ये ४ थायलंड आणि २ आसाम मधील तरुणीचा समावेश आहे.

आरोपी मसाज सेंटरमध्ये पीडित मुलींकडून वेश्या व्यवसाय करुन घेत होते. वेश्या व्यवसायातून मिळणाऱ्या पैशातून आरोपी स्वतःची उपजिवीका भागवत असल्याचे तपासात समोर आले. या कारवाईत पोलिसांनी 45 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. पुढील तपास कोरेगाव पार्क पोलीस करीत आहेत.

Related Articles

ताज्या बातम्या