पुणे – गौरव दुग्गल (वय ४५, रा. ब्रह्मा सनसिटी, वडगाव शेरी) असे गुन्हा दाखल केलेल्याचे नाव आहे. याप्रकरणी २९ वर्षीय महिलेने फिर्याद दिली आहे. मैत्रीणी सोबत कोरेगाव पार्क येथील हॉटेल ‘प्लंझ’मध्ये पार्टी करण्यासाठी गेलेल्या तरुणीचा विनयभंग करण्यात आल्याची घटना समोर आली आहे. ही घटना रविवारी रात्री ६:१५ सुमारास हॉटेल ‘प्लंझ’ येथील सार्वजनिक जागेत घडली. या प्रकरणी कोरेगाव पार्क पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फिर्यादी ही तिची मैत्रीणीसह ‘प्लंझ’ मध्ये पार्टी करण्यासाठी गेली होती. त्यावेळी मैत्रीणीचा पूर्वीचा मित्र गौरव दुग्गल हा तिथे भेटला. थोडा वेळ सोबत बसल्यानंतर त्याने या तरुणीला अश्लील भाषेत शिवीगाळ सुरू केली. ‘तु आमच्यामध्ये जास्त ढवळाढवळ करू नकोस. तुझी लायकी आणि औकात काय आहे मला माहिती आहे. तुझे कोणासोबत लफडे सुरू आहे, हे मला माहिती आहे.’ असे म्हणत शिवीगाळ केली.