हवेली – उरूळी कांचन पोलीस स्टेशन परिसरात भेसळयुक्त सिमेंटचा कारखाना मोठ्या प्रमाणात काही अधिकाऱ्यांच्या आशिर्वादाने सुरू आहे.आमंच्या प्रतिनिधीला नाव न सांगण्याच्या अटीवर स्थानिक लोकांनी दिलेल्या माहीतीच्या आधारे सविस्तर पहाणीत बरेच प्रकारचे पोलखोल करणारे व्हिडीओ हाती लागले आहेत. बनावट आणि कमी दर्जाचे भेसळयुक्त सिमेंट दुसर्या दर्जेदार कंपनीच्या खाली बॅगमध्ये भरून विक्री सध्या पुण्यात चालू आहे. पुणे शहरातील हवेलीतील उरूळी कांचन परीसरात सध्या येकच खळबळ चालू आहे. दरम्यान, स्थानिक पोलीसांनी लक्ष घालून या बनावट सिमेंटचे मोठे घबाडच उघडकीस आणावे असे स्थानिक नागरींकाचे म्हणने आहे. याप्रकरणी स्थानिक पोलीसांनी कारवाई करणे कगजेचे आहे.
याबाबत स्थानिक नागरींकानकडून मिळालेल्या प्राथमिक माहिती अशी की, दर्जेदार कंपनीच्या खाली सिमेंटच्या पोत्यात बनावट आणि कमी दर्जाचे सिमेंट भरून पुणे शहरात विक्री केल्या जात असल्याची माहिती द पब्लिक पॅावर च्या वार्ताहाराला मिळाली. या गुप्त माहितीच्या आधारे
स्थानिक नागरीकाला विश्वासात घेऊन विचार पुस केली असता त्याने दिलेल्या माहितीच्या आधारे उरूळी कांचन परीसरात नवनाथ काळभोर व त्याचे दोन साथीदार हा व्यवसाय करत आहेत व त्याच्या गोदामात मिक्स सिमेंट बँग व सिमेंट, तसेच रिकाम्या पिशव्या, सिलाई मशीन, सिमेंट गाळण्याची जाळी, फावडे, टोपले, असा मुद्देमाल जमा आहे.
भेसळयुक्त सिमेंटचा बांधकामासाठी वापर
बांधकामाचे कंत्राट दिल्यानंतर कोणते सिमेंट वापरणार साहित्य काय वापरणार असा करार केला जातो त्यानुसार ठराविक कंत्राटदाराला रक्कम अदा केली जाते मात्र तंत्रालदाराकडून नफा वाढवण्यासाठी भेसळयुक्त सिमेंटचा वापर करण्यात येतो. त्यामुळे बांधकाम करताना नागरिकांनी सतर्कता बाळगावी असे आव्हान वेळोवेळी पोलीस प्रशासनाकडून करण्यात येत असते तरीदेखील हवेलीतील उरुळी कांचन परिसरात भेसळ युक्त सिमेंटचाकारखाना कोणाच्या आशीर्वादाने सुरू आहे यावर योग्य ती कारवाई करून हा सर्व प्रकार बंद करावा. अशी स्थानिक नागंरीकांची मागणी आहे.