22.8 C
New York
Monday, August 25, 2025

Buy now

spot_img
spot_img

पारनेर तालुक्यातील LCB चे हप्ते वसुली करणाऱ्या अवैध व्यवसाईकाचा पत्यांचा क्लॅब बंद होणार का? अवैध धंद्यांमुळे अनेकांचे कुटुंब होतेय उद्ध्वस्त… शहरातील अवैध कत्तलखाने, जुगार, बिंगो,चक्री,सोरेट,दारूविक्री, गुटखा विक्री या अवैध धंद्यांचा सुळसुळाट..!

THE PUBLIC POWER ( पारनेर ) : तालुक्यात मोठ्या प्रमाणात अवैध धंदे सुरू असताना काही दिवसापूर्वी अळकुटी गाव रांधेफाटा येथे संतोष गायकवाड यांचा 25/50 असा दोन टेबल लावून पत्त्यांचा क्लब हॉटेल जोगेश्वरी व्हेज नॉनव्हेज येथे सुरू असून विनापरवाना दारू ही या हॅाटेलमध्ये आहे तरीही पोलीस याकडे लक्ष देत नसल्याचे नागरिकांमध्ये बोलले जात आहे ठोस कारवाई करून पत्त्यांचा अड्डा नष्ट करावा कारण संतोष गायकवाड यांच्या पत्त्यांचा क्लब व LCB स्कॅाड ची वसुली करणारा झीरो अशी पारनेर तालुक्यात चांगलीच चर्चा आहे. याबाबत नागरिकांनी पोलीसांन बाबत तीव्र संताप व्यक्त केला आहे.

पारनेर तालुक्यांमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये अवैध व्यवसाय सुरू असून दारू परवानाधारक हॉटेल पेक्षा विनापरवाना हॉटेल मध्ये मोठ्या प्रमाणात आहे. त्याच अनेक हॉटेलमध्ये बनावट दारू विक्री केली जात असल्याची माहिती समोर येत आहे. त्याचप्रमाणं मटका गुटका, बिंगो हे उद्योग पोलिसांच्या आशीर्वादाने सुरू असल्याची चर्चा आहे.

तालुक्यात अवैधरीत्या चालणाऱ्या दारू अड्डयाकडे दुर्लक्ष कसे झाले अवैधरीत्या दारू व्यवसाय तालुक्यात मोठ्या प्रमाणात होत आहे.त्याला कायमस्वरूपी निर्बंध का लागत नाही यावर देखील विचार होणे गरजेचे आहे. हॉटेल व ढाब्यांवर जुजबी कारवाई करून कारवाई केली जाते मात्र यातून देखील मोठी उलाढाल होत असल्याचे बोलले जात आहे.
तसेच चोऱ्या, दुचाकीचोरी व मुलींना फूस लावून पळविण्याचे प्रमाण खूप वाढले आहे. त्यामुळे तालुक्यात भीतीचे वातावरण निर्माण झालेले आहे. गुन्हेगारांवर पोलिसांचा धाक राहिलेला नाही, अशी चर्चा सुरू आहे.सध्या तालुक्यातील गुन्हेगारी मोठ्या प्रमाणावर वाढली आहे.

तालुक्यात अनेक ठिकाणी छोट्या-मोठ्या चोऱ्या, अवैध व्यवसाय, तसेच अल्पवयीन मुली पळवणे, त्याचबरोबर दुचाकीच्या चोऱ्यांचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे तालुक्यात कायदा आणि सुव्यवस्थेचा बोजवारा उडाला आहे. तालुक्यात सध्या गुन्हेगारांनी तोंड वर काढले असून पोलिसांचा धाक राहिला नाही, अशी चर्चा तालुक्यात सुरू आहे.

तालुक्यातील चोऱ्यांची संख्या वाढली आहे. चोऱ्या, भांडणे मारामाऱ्या त्याचबरोबर दुचाकी चोऱ्या ही बाब तर नित्याचीच झाली आहे. सुपे येथे औद्योगिक वसाहत असल्याने देशातील अनेक राज्यांतून विविध कंपन्या, तसेच बांधकाम व्यवसाय, हॉटेल यांसाठी अनेक कामगार येथे येतात. हे कामगार सुपे येथे खोल्या भाड्याने घेऊन राहतात. घरमालक हे ते फक्त जास्त भाडे देणाऱ्याला खोल्या भाड्याने देतात. मात्र, तो कामगार कुठून आला आहे, कोठे काम करतो, याचा विचार न करता फक्त जास्तीत जास्त भाडे कसे मिळेल याचा विचार करतात. त्यामुळे हे कामगार नेमके कोण आहेत, कोणत्या राज्यातील आहेत, याविषयाची कोणतीही माहिती घरमालक, ग्रामपंचायत किंवा पोलिसांना नसते.

Related Articles

ताज्या बातम्या