पुणे : गांजा विक्री करणाऱ्याला कोंढवा पोलीसांनी ठोकल्या बेड्या दिनांक ०८/०३/२०२४ रोजी, श्री राजेश उसगांवकर सहा. पोलीस निरीक्षक, पोहवा.६९४६ वंजारी, पोलीस अंमलदार १००७५ राजगे, पोलीस अंमलदार ८७५१ खाडे, पोलीस अंमलदार ८३५२ महारनवर, पोलीस अंमलदार ३५११ हिरवे यांच्यासह कोंढवा पोलीस ठाणे हद्दीत पेट्रोलिंग करित असताना पोलीस अंमलदार राजगे यांना त्यांच्या गुप्त बातमीदार मार्फतीने बातमी मिळाली की, एच एम रॉयल सोसायटी कोठारी स्कूल जवळ, कोंढवा ब्रु, पुणे येथे एक इसम कोणता तरी अंमली पदार्थ विक्री करत असल्याचे सपोनि राजेश उसगांवकर याना कळविल्याने त्यांनी वरिष्ठाच्या आदेशान्वये सदर ठिकाणी जाऊन पाहणी केली. सदर ठिकाणी इसम नामे मार्शल उमाकांत मोरे, वय २० वर्षे, रा लक्ष्मीनगर गल्ली नं ७, हनुमान मंमदीराच्या जवळ कोंढवा ब्रु, पुणे याने त्याचे ताब्यात किं.रु. ३२१०/- रु चा १९६ ग्रॅम गांजा, हा अंमली पदार्थ अनाधिकाराने, बेकायदेशिररित्या विक्रीकरीता जवगांज्याचीळ बाळगताना मिळुन आल्याने त्यांचेवर वरील स्टाफच्या मदतीने कारवाई करुन गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दाखल गुन्हयाचा पुढील तपास अनिल सुरवसे, सहा. पोलीस निरीक्षक हे करित आहेत. दिनांक ११/०३/२०२४ रोजी पावेतो पोलीस कस्टडीमध्ये आहेत.
वरिलप्रमाणे कामगिरी ही मा.ए आर राजा, पोलीस उप आयुक्त साो परि.०५, मा गणेश इंगळे, सहा. पोलीस आयुक्त, वानवडी विभाग, श्री संतोष सोनवणे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, श्री मानसिंग पाटील निरीक्षक (गुन्हे), यांच्या मार्गदर्शन व सुचनाप्रमाणे सपोनि उसगांवकर, पोहवा. ६९४६ वंजारी, पोलीस अंमलदार १००७५ राजगे, पोलीस अंमलदार ८७५१ खाडे, पोलीस अंमलदार ८३५२ महारनवर, पोलीस अंमलदार ३५११ हिरवे यानी केली आहे.