शिट्टी का मारली अशी विचारणा करीत शाळेची गॅदरिंग पाहत असताना ४ ते ५ जणांच्या समूहाने केलेल्या बेदम मारहाणीत २ दलित युवकांना गंभीर जखमी करून आरोपी अजून मोकाट.
THE PUBLIC POWER ( उस्मानाबाद ): धाराशिव जिल्ह्यातील लाहोरा तालुका लोहारा खुर्द गावातील सोमनाथ बालाजी मोदळे व त्यांचे नातेवाईक राहुल अनुरथ गायकवाड व दिनेश सर्जेराव वाघमारे दोघे राहणार पाटोदा जिल्हा धाराशिव या दलित तरुणांना 2 मार्च रोजी रात्री ९ वाजता शाळेची गॅदरिंग पाहत असताना शिट्टी मारल्याचा खोटा आरोप करून गंभीर मारहाण झाली आहे. शाळेची गॅदरिंग मध्ये शिट्टी का मारली अशी विचारणा करीत शाळेची गॅदरिंग पाहत असताना संदीप प्रभू रसाळ, गोपाळ मुर्टे, शुभम व्यंकट रसाळ, मंगेश विष्णू रसाळ व प्रेमनाथ रसाळ यांनी त्यांच्यावर हल्ला केला.
“रात्री सुमारे ९ वाजले होते आणि आम्ही शाळेतील गॅदरिंग पाहत होतो. शाळेची गॅदरिंग मध्ये शिट्टी का मारली अशी विचारणा करीत शाळेची गॅदरिंग पाहत असताना संदीप प्रभू रसाळ, गोपाळ मुर्टे, शुभम व्यंकट रसाळ, मंगेश विष्णू रसाळ व प्रेमनाथ रसाळ यांनी आमच्यावर हल्ला केला,” सोमनाथ बालाजी मोदळे,राहुल अनुरथ गायकवाड व दिनेश सर्जेराव वाघमारे म्हणाले. “त्यांनी मला जातीवाचक शिवीगाळ केली आणि लाता बुक्क्यांनी आणि नंतर काट्यांनी मारहाण केली. मला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले,” तो म्हणाला,
“माझे त्या लोकांशी शत्रुत्व नव्हते तरीही त्यांनी फक्त शिट्टी मारल्याचा खोटा आरोप करून माझ्यावर हल्ला केला,” राहुल अनुरथ गायकवाड पुढे म्हणाले, ज्यांना गंभीर दुखापत झाली आहे.