शहरातील अवैध बायोडिझेल, कत्तलखाने, जुगार, बिंगो,चक्री,सोरेट,दारूविक्री, गुटखा विक्री या अवैध धंद्यांचा सुळसुळाट..!
THE PUBLIC POWER ( पारनेर ) : तालुक्यात मोठ्या प्रमाणात अवैध धंदे सुरू असताना काही दिवसापूर्वी अळकुटी गाव रांधेफाटा येथे संतोष गायकवाड यांचा 25 50 असा दोन टेबल लावून पत्त्यांचा क्लब हॉटेल जोगेश्वरी व्हेज नॉनव्हेज येथे सुरू झाला असून पोलीस याकडे लक्ष देत नसल्याचे नागरिकांमध्ये बोलले जात आहे ठोस कारवाई करून पत्त्यांचा अड्डा नष्ट करावा कारण संतोष गायकवाड यांच्या पत्त्यांचा क्लब ची तालुक्यात चांगलीच चर्चा झाली आहे. याबाबत
नागरिकांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे.
पारनेर तालुक्यांमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये अवैध व्यवसाय सुरू असून दारू परवानाधारक हॉटेल पेक्षा विनापरवाना हॉटेल मोठ्या प्रमाणात आहे. त्याच अनेक हॉटेलमध्ये बनावट दारू विक्री केली जात असल्याची माहिती समोर येत आहे. त्याचप्रमाणं मटका गुटका, बिंगो हे उद्योग पोलिसांच्या आशीर्वादाने सुरू असल्याची चर्चा आहे.
तालुक्यात अवैधरीत्या चालणाऱ्या दारू अड्डयाकडे दुर्लक्ष कसे झाले अवैधरीत्या दारू व्यवसाय तालुक्यात मोठ्या प्रमाणात होत आहे.त्याला कायमस्वरूपी निर्बंध का लागत नाही यावर देखील विचार होणे गरजेचे आहे. हॉटेल व ढाब्यांवर जुजबी कारवाई करून कारवाई केला जातो मात्र यातून देखील मोठी उलाढाल होत असल्याचे बोलले जात आहे.
तालुक्यात अवैध दारू विक्री करणारे अनेक धाबे हॉटेलवर विनापरवाना बनावट दारू विकणारे व्यवसायिक आहेत. त्यांच्यावर कोणतीही कारवाई होत नाही कारण वसुली च्या माध्यमातून महिन्याला मोठा मलिदा मिळत असल्याची माहिती एका हॉटेल व्यवसायिकानी नाव न छापण्याच्या अटीवर दिली आहे.
तालुक्याचे क्षेत्रफळ मोठे पोलीस कर्मचाऱ्यांची संख्या कमी आहे हे मुख्य कारण असले तरी असणारे कर्मचारी यांच्याकडूनच अनेक वेळा अवैध व्यवसायांवर डोळेझाक होत असते त्यामुळेच व्यवसायिक खुलेआमपणे व्यवसाय सुरू ठेवत असतात. त्यामुळे गुन्हेगारी प्रवृत्ती वाढत आहे याचा सर्वसामान्य नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. गुन्हे सातत्याने वाढत असताना आता अवैध धंदे फोफावल्याचे विदारक चित्र आहे. मटका, हातभट्टी दारू, सौरट, गुटख्याला बंदी असतानाही गुटखा राजरोसपणे विकला जातोय.
बनावट दारू विना परवाना हॉटेलची संख्या जास्त !
तालुक्यातील पारनेर ते आळकुटी पर्यंत अनेक हॉटेल आहेत पारनेर ते सुपा या रोड हॉटेल आहे सुपा हद्दीत नगर पुणे हायवे ये वर अनेक हॉटेल ला दारू विक्री परवाना नाही पारनेर ते टाकळी ढोकेश्वर टाकळी ढोकेश्वर ते पारनेर हद्दीतील गावांमध्ये हॉटेल आहेत तसेच पारनेर ते भाळवणी येथे देखील विनापरवाना हॉटेल आहेत मात्र त्या सर्व हॉटेल वर अवैधरित्या बनावट दारू विक्री करत असल्याचे दिसुनही कोनाच्या आशीर्वादाने कारवाई होत नाही.