26.1 C
New York
Sunday, August 24, 2025

Buy now

spot_img
spot_img

पुणे शहरातील पब, बार, रेस्टोरंट आणि हॉटेल्स रात्री दीड वाजेपर्यंत सुरु ; परंतु हुक्क्याला बंदी…

THE PUBLIC POWER ( पुणे ): पुणे शहरातील पब, बार, रेस्टोरंट आणि हॉटेल्स पूर्वीप्रमाणेच रात्री दीड वाजेपर्यंत सुरु ठेवता येणार आहेत. हॉटेल आणि पब मालकांनी नियमांचे पालन केल्यास पोलिस आतमध्ये येऊन कोणत्याही प्रकारे अडथळा निर्माण करणार नाहीत, असे आश्वासन पुण्याचे पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी पब आणि बार मालकांना बैठकीनंतर दिले आहे. परंतु, हुक्क्याला बंदी असणार आहे.

पब आणि बार मालकांकडून अनेकदा नियमांचे उल्लंघन केल्याचा दावा करत पोलिसांकडून कारवाई करण्यात येते तर पोलिस जाणीवपूर्वक त्रास देत असल्याने व्यावसायावर परिणाम होत असल्याची पब आणि बार मालकांची तक्रार असते. यावर उपाय शोधण्यासाठी पुण्यातील पब, बार आणि हॉटेल व्यवसायिकांची पुण्याचे पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांच्यासोबत बैठक पार पडली.

या बैठकीत पुण्यातील पब, बार आणि सर्व प्रकारची हॉटेल्स पूर्वीप्रमाणे दीड वाजेपर्यंत सुरु ठेवण्यास येथून पुढे देखील परवानगी असणार आहे. पोलिस आयुक्त्यांच्या या भूमिकेमुळे अनेकदा स्थानिक पोलिसांकडून होणाऱ्या विनाकारण त्रासाला आळा बसेल, असे पब मालकांना वाटत आहे. मात्र, रात्री दीड वाजेपर्यंत पब आणि रेस्टोरंट सुरु ठेवताना पब आणि रेस्टोरंट मालकांना नियमांचे पालनही करावे लागणार आहे.

नियमावली पुढीलप्रमाणे…
कोणत्याही प्रकारच्या हुक्क्याला पुण्यात बंदी असणार आहे.
– रूफ टॉप हॉटेलमधील साउंड सिस्टीम रात्री दहा वाजता बंद करावी लागणार आहे.
परवाना नसलेल्या हॉटेलमध्ये दारू पिताना आढळल्यास दारू पिणाऱ्यावर आणि हॉटेल मालक अशा दोघांवर कारवाई करण्यात येणार आहे.
– पोलिसांनी गरज असेल तरच बार आणि पबच्या आतमध्ये प्रवेश करावा अन्यथा व्यवसायायात अडथळे आणू नयेत अशा सूचना देण्यात आल्या आहेत.

दरम्यान, पोलिसांनी घेतलेल्या या भूमिकेचे हॉटेल आणि पब व्यवसायिकांबरोबरच सामान्य जनतेकडून स्वागत करण्यात येते आहे. नागरिकांना त्रास न होता हॉटेल्स आणि पब सुरु राहण्यास हरकत नाही, असे नागरिकांचे म्हणणे आहे. पब, हॉटेल आणि बार ही पुण्यासारख्या महानगरांमध्ये एकाचवेळी तरुणाईच्या आकर्षणाची केंद्रं आहेत तर दुसरीकडे नशेच्या बाजारांचे अड्डे देखील इथूनच चालवले जात असल्याचं दिसून आलं आहे. त्यामुळे तरुणाईने नाईट-लाईफ एन्जॉय करावी, पण नियमांचे भान राखून एवढीच पुणे पोलिसांची अपेक्षा आहे.

Related Articles

ताज्या बातम्या