Nexon iCNG : टाटा मोटर्सकडून इलेक्ट्रिक कार सेगमेंट बरोबरच त्यांचा CNG कार सेगमेंट देखील मजबूत करण्यात आला आहे. तसेच cng कार आणखी मजबूत करण्यासाठी टाटाकडून आता त्यांच्या लोकप्रिय Nexon एसयूव्ही कारचे CNG मॉडेल लवकरच लॉन्च केले जाणार आहे.
टाटा मोटर्सकडून अलीकडेच Nexon एसयूव्ही कारच फेसलिफ्ट मॉडेल लॉन्च करण्यात आले आहे. या कारच्या डिझाईनपासून फीचर्सपर्यंत अनेक बदल करण्यात आले आहेत. आता टाटा मोटर्स Nexon फेसलिफ्ट एसयूव्ही कारच्या डिझाईनमध्येच CNG पर्याय दिला जाऊ शकतो.
टाटा मोटर्सकडून भारत ऑटो शोमध्ये त्यांची Nexon CNG कार सादर करण्यात आली आहे. कारमध्ये शक्तिशाली इंजिन दिले जाणार आहे. कारच्या मायलेजमध्ये देखील वाढ होईल.
टाटा मोटर्सकडून Nexon CNG एसयूव्ही कारची चाचणी देखील घेण्यात येत आहे. टाटाने आतापर्यंत त्यांच्या पंच, Altroz, Tiago आणि Tigor कारमध्ये CNG पर्याय दिला आहे. नेक्सॉन CNG कार मारुती सुझुकी ब्रेझा एसयूव्ही कारशी स्पर्धा करेल.
Nexon CNG शक्तिशाली इंजिन
टाटाकडून त्यांच्या Nexon CNG कारमध्ये 1.2 लीटर पेट्रोल इंजिन दिले जाणार आहे. याच इंजिनला कंपनी फिटेड CNG किट देण्यात येणार आहे. कारमध्ये 6 स्पीड मॅन्युअल आणि ऑटोमॅटिक ट्रान्समिशन पर्याय दिला जाऊ शकतो.