मुंबई : आमिर खानच्या ‘दंगल’ या सुपरहिट चित्रपटात काम करणारी अभिनेत्री सुहानी भटनागरचं निधन झालं आहे. वयाच्या अवघ्या 19 व्या वर्षी सुहानीने या जगाचा कायमचा निरोप घेतला आहे.
सुहानाच्या निधनाने चाहत्यांना मोठा धक्काच बसला आहे. सुहानीच्या शरिरामध्ये पाणी जमा झालं होतं. त्यामुळे तिचं निधन झालं. काही दिवसांपूर्वी सुहानीचा अपघात झाला होता. त्यामुळे तिच्या पायाला फ्रॅक्चर झाला होता.
सुहानी भरनागरच्या मृत्यूमुळे सगळ्यांना धक्का बसला आहे. ती हरियाणा येथील फरिदाबादमध्ये राहत होती. तिचं वय फक्त 19 वर्ष होतं. आज संध्याकाळी फरिदाबाद येथील अजरौंदा स्मशानभूमीत अंत्यसंस्कार केले जाणार आहे. फरिदाबाद येथील रहिवासी असलेल्या सुहानी भटनागरचा मृत्यू शरीरात पाणी भरल्याने तिचा मृत्यू झाल्याचं सांगण्यात येतंय. काही काळापूर्वी सुहानीचा अपघात झाला होता, त्यामुळे तिचा पाय फ्रॅक्चर झाला होता. यासाठी तिच्यावर उपचार सुरू होते. उपचारादरम्यान तिने जी औषधं घेतली होती, त्याचं रिएक्शन झालं होतं. त्यामुळे तिच्या शरिरात पाणी जमा झालं होतं. गेल्या काही दिवसांपासून तिच्यावर दिल्लीतील एम्स रुग्णालयात बराच काळ उपचार सुरु होते. पण तिची मृत्यूशी झुंज अपयशी ठरली असून अवघ्या 19 व्या वर्षी तिनं जगातून कायमचा निरोप घेतला.